शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

VIDEO : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 15:22 IST

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाजार समित्या सव्वा महिन्यापासून बंद असल्याने कांदा सडू लागला आहे.

नितीन बोरसे

सटाणा (नाशिक), दि. ८ - आडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी पुकारलेला बंद, आडत मुक्तीचा स्वागताहर्य निर्णय घेतला खरा पण गोनी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद अशा परिस्थिती सरकारचे मौन ,विरोधी बाकावरील मंडळीची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंद मुळे साठवलेला कांदा सडू लागला आहे तर काहींचे वजन घटून लागले आहे.आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो काढण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.दरम्यान यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी अभूतपूर्व तीव्र पाणी टंचाई मुळे लागवडीच्या पस्तीस टक्के कांदा अक्षरश: कांदापीक अर्धवट सोडून द्यावे लागले त्यातच अवकाळी पाऊस ,गारपीटचे ग्रहण ,पंचेचाळीस अंश पर्यंत चढलेला पारा यामुळे उर्विरत कांदा साठवण क्षम आहे की नाही याबाबत प्रश्न चिन्ह असतांना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तिवली जात आहे.नाशिक जिल्यातील बागलाण ,मालेगाव ,देवळा ,कळवण ,चांदवड ,निफाड ,सिन्नर ,दिंडोरी ,येवला ,नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात .खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते .उन्हाळ कांदा राज्याच्या उत्पादनाच्या चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो . यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर ,येवला ,चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्र मण ,अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे.याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती.त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली .मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली.तर उर्विरत क्षेत्रावरील कांदा पिक एन जोमात असतांना प्रचंड तापमान ,त्यात अवकाळी पाऊस आण िगारपीटच्या फेर्यात सापडल्याने ते पिक जरी निघाले असले तरी ते साठवण क्षम नसल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.तरी देखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे.