शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:21 IST

गुंड निलेश घायवळचे रोहित पवार यांच्या मातोश्रीकडून कौतुक होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nilesh Ghaywal: कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपी निलेश घायवळ याचे नाव राज्यातील अनेक नेत्यांसोबत जोडले जात असल्याने  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असू शकतात असा धक्कादायक आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. गुंड निलेश घायवळ हा सभापती राम शिंदे सर यांच्या जवळचा आहे, असंही रोहित पवार म्हणाले. त्यानंतर निलेश घायवळ याचा राम शिंदेंसोबतचा व्हिडीओ समोर आला होता. रोहित पवारांच्या आरोपांनंतर आता भाजपनेही व्हिडीओतूनच प्रत्युत्तर दिलं आहे. 

गुंड निलेश घायवळचा सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानतंर भाजपने रोहित पवार यांचे सचिन घायवळसोबतचे फोटो समोर आणले आहेत. तसेच रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचाही निलेश घायवळसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. शस्त्र परवान्यामुळे चर्चेत आलेल्या सचिन घायवळसोबत रोहित पवार बोलत असल्याचे फोटो भाजपकडून पोस्ट करण्यात आले. शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला.

दुसरीकडे, रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. निलेश घायवळने केलेल्या मदतीचे सुनंदा पवार यांनी जाहीर कौतुक केले होते. आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोव्हिड काळात निलेश घायवळने शाळेला मदत केल्याने सुनंदा पवार यांनी त्यांचे आभार मानले होते. निलेश भाऊंचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही खूप गरजेची गोष्ट या शाळेला दिली. याच्यासाठी तुमचे मनापासून आभार, असं  सुनंदा पवार व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

दरम्यान,  पुण्यातील कोथरुड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो लंडनला पळून गेला आहे. गुन्हा दाखल असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचे समोर आल्याने वातावरण तापले आहे. दोन्ही घायवळ बंधुंचे राज्यातील अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar's mother praised gangster Nilesh Ghaywal; photos with Sachin revealed.

Web Summary : Controversy erupts as Nilesh Ghaywal's connections with politicians surface. BJP countered Rohit Pawar's allegations by revealing his ties to Sachin Ghaywal and Sunanda Pawar's video praising Nilesh for school aid during COVID. Ghaywal is accused in a shooting case and fled to London.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदे