ऑनलाइन लोकमतजऊळका रेल्वे (वाशिम), दि. 08 - येथून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या नदीकाठानजिक सरोतिर्थावर काशिनाथ महाराजांचे समाधी स्थळ आहे. या स्थळावर नागपंचमीच्यादिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नागपंचमीच्या दिवशी काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असलेल्या आसनावर (गादी) दुपारी ४ वाजता एका सापाचे आगमन झाले. ८ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत या सापाचे येथेच वास्तव्य राहिल्याने अनेक भाविकांनी नागपंचमीच्या दिवशी त्याचे दर्शन घेतले व काहींनी गादीवर फुले टाकून पूजन सुध्दा केले. हि बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.