VIDEO- शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 9, 2016 18:21 IST2016-10-09T17:28:45+5:302016-10-09T18:21:51+5:30
नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.

VIDEO- शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका- मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, या मुलीची प्रकृती चांगली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.
या प्रकरणानंतर समाजमाध्यमांतून निरनिराळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र त्या पूर्णत: चुकीच्या आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता पाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.