video: अनंत अंबानीच्या लग्नात John Cena ने धरला ठेका, पाहा त्याचा भन्नाट डान्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 21:55 IST2024-07-12T21:54:47+5:302024-07-12T21:55:59+5:30

Anant Radhika Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी देश-विदेशातून पाहुणे आले आहेत.

video: John Cena dance at Anant Ambani's wedding, watch his amazing dance | video: अनंत अंबानीच्या लग्नात John Cena ने धरला ठेका, पाहा त्याचा भन्नाट डान्स...

video: अनंत अंबानीच्या लग्नात John Cena ने धरला ठेका, पाहा त्याचा भन्नाट डान्स...

Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज(दि.12) एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी देश-विदेशातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, WWE सुपरस्टार जॉन सीनादेखील (John Cena) या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली. या लग्नात जॉनने खास पारंपरिक भारतीय पोषाखात एन्ट्री घेतली आणि डान्सदेखील केला. सध्या त्याच्या अनोख्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जॉन सीनाचा व्हिडिओ व्हायरल...
अनंत-राधिकाच्या लग्नाच्या मिरवणुकीतील जॉन सीनाने भन्नाट डान्सदेखील केला. सध्या त्याच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो ढोलच्या तालावर अनोख्या पद्धतीने नाचातना दिसतोय. भारतात जॉन सीनाचे लाखो-करोडो चाहते आहेत. त्याचा हा डान्सचा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतोय. 

जॉन सीनाची WWE मधून निवृत्ती
जॉन सीनाने 2002 मध्ये रेसलिंग करिअरला सुरुवात केली. आता लवकरच त्याच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीला ब्रेक लागणार आहे. जॉन सीनाने नुकतीच WWE मधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या रेसल मेनियामध्ये जॉन अखेरचा सहभाग घेईल. 
 

Web Title: video: John Cena dance at Anant Ambani's wedding, watch his amazing dance