जव्हार अंगणवाडी सेविकांचे निकृष्ट मोबाईल कार्यालयाबाहेर काढताना व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 20:23 IST2021-08-26T20:22:02+5:302021-08-26T20:23:21+5:30
हुसेन मेमन, जव्हार शासकीय कामासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याने सध्या सर्वत्र मोबाईल परत करण्यासाठी सेविकांचे ...

जव्हार अंगणवाडी सेविकांचे निकृष्ट मोबाईल कार्यालयाबाहेर काढताना व्हिडिओ व्हायरल
हुसेन मेमन, जव्हार
शासकीय कामासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याने सध्या सर्वत्र मोबाईल परत करण्यासाठी सेविकांचे आंदोलने सुरू आहेत, त्यामुळे जव्हार येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा करण्यात आलेले 130 मोबाईल गुरुवारी शिपाईच्या मदतीने बाहेर काढतांना बालविकास प्रकल्प अधिकारी विभूते यांचा विडिओ व्हायरल झाला आहे.
निकृष्ट मोबाईल परत करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे, त्यामुळे जव्हारच्या 130 अंगणवाडी सेविकांनी आपले निकृष्ट मोबाईल कार्यालयात जमा करण्यासाठी गेले असता ते ताब्यात न घेता प्रकल्प अधिकारी विभूते यांनी परस्पर कार्यालयाच्या बाहेर टाकून देण्यात आले, त्यामुळे सेविका वैतागल्या. अखेर हा प्रकार कार्यलयाच्या बाहेर एका व्यक्तीने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि तो आता चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विभूते यांच्या अडचणीत वाढ होणार असून, वरीष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे. सेविकांनी दिलेले 130 मोबाइल पंचनामा करण्यासाठी बाहेर काढले होते, ते पंचनामा करून पुन्हा ताब्यात घेतले. गणेश विभूते, ए. बालविकास अधिकारी, जव्हार