VIDEO- जळगावात रत्नपिंप्री श्रीबालाजी महाराज रथोत्सवातील पालखी सोहळा उत्साहात साजरा

By Admin | Updated: October 28, 2016 00:10 IST2016-10-28T00:10:16+5:302016-10-28T00:10:16+5:30

पाचोरा येथे श्रीबालाजी महाराज रथोत्सवापाठोपाठ आज पालखी सोहळा ही उत्साहात झाला.

VIDEO-Jalgaon Ratnapampree Shribalaji Maharaj celebrates the Rakshasvya Palkhi Ceremony | VIDEO- जळगावात रत्नपिंप्री श्रीबालाजी महाराज रथोत्सवातील पालखी सोहळा उत्साहात साजरा

VIDEO- जळगावात रत्नपिंप्री श्रीबालाजी महाराज रथोत्सवातील पालखी सोहळा उत्साहात साजरा

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - पाचोरा येथे श्रीबालाजी महाराज रथोत्सवापाठोपाठ आज पालखी सोहळा ही उत्साहात झाला. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविकांनी आपला सहभाग नोंदविला. श्रीबालाजी महाराज यांच्या महापूजेनंतर स्वामी पूर्णानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने श्री माणिक स्वामी आश्रमापासून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.

सर्वप्रथम दबापिंप्री, होळपिंप्री, रत्नापिंप्रीच्या गल्लोगल्लीत पालखी नेण्यात आली. शेकडो भाविकांनी 'श्री'चे दर्शन घेतले. हा पालखी सोहळा दुपारी चार वाजेपासून तर रात्री उशीरा पर्यंत सुरूच होता. विशेषत: पालखी सोहळ्यास महिलांची गर्दी दिसून आली. महिला भजने म्हणत होत्या.

तर तरुण लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज कि जय हो नारे लावत होती, तर मिरवणूक भजनी बँन्डच्या भजनाच्या मधूर आवाज व वाजंत्रींच्या आवाजाने गावात धार्मिक वातावरणाचे चैतन्य निर्माण झालेले दिसून आले. पालखी येणाऱ्या प्रत्येक घरासमोर सडा रांगोळीने तयार करण्यात आले होते.

Web Title: VIDEO-Jalgaon Ratnapampree Shribalaji Maharaj celebrates the Rakshasvya Palkhi Ceremony