VIDEO : लालबाग फ्लायओव्हरवर जड वाहनांना तूर्तास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 13:38 IST2016-11-10T12:52:08+5:302016-11-10T13:38:25+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 10 - लालबाग फ्लायओव्हरवर तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले ...

VIDEO : लालबाग फ्लायओव्हरवर जड वाहनांना तूर्तास बंदी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - लालबाग फ्लायओव्हरवर तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सध्या फ्लायओव्हर भायखळ्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर परळच्या दिशेने जाणारी वाहतूक फ्लायओव्हरखालून वळवण्यात आली आहे.
त्यामुळे परिसरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सकाळी लालबाग फ्लायओव्हरवरील दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक बंद असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
फ्लायओव्हरवर तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने बुधवारी रात्रीपासूनच यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
व्हिडीओ-फोटो - चेतन ननावरे
{{{{dailymotion_video_id####x844hfy}}}}
फ्लायओव्हर व्हिडीओ - दत्ता खेडेकर
https://www.dailymotion.com/video/x844hfy