VIDEO : विश्वांजलीला जायचे आहे परराष्ट्र सेवेत
By Admin | Updated: May 31, 2017 21:51 IST2017-05-31T21:29:08+5:302017-05-31T21:51:44+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 31 - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर ...

VIDEO : विश्वांजलीला जायचे आहे परराष्ट्र सेवेत
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून विश्वांजली गायकवाड प्रथम आली असून देशभरातून तिचा ११ वा क्रमांक आहे. विश्वांजली दुस-या प्रयत्नांमध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाली असून तिला परराष्ट्र सेवेत जायचे असल्याचे तिने सांगितले.
विश्वांजलीने सीओईपीमधून कम्प्युटर इंजिनीअरींग २०१४ मध्ये केले आहे. गेल्या ३ वर्षापासून ती यूपीएससीची तयारी करीत होती. तिचे आई व वडील दोघेही मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. तिचा भाऊ इंजिनिअरींग करतो आहे.
विश्वांजली राज्यात पहिली आल्याचा निकाल जाहीर होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. प्रभात रोडवरील तिच्या निवासस्थानी तिचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली.