शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Video : “सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जायचं हं!”; चिमुकलीनं मागितलं मुख्यमंत्र्यांकडे प्रॉमिस आणि…

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 11:27 IST

महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यादरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले होते.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यादरम्यान शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना सूरत आणि नंतर गुवाहाटीला हॉटेलमध्ये नेण्यात आलं होतं. दरम्यान, राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सध्या एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. एका चिमुकलीनं मुख्यमंत्र्यांकडे प्रॉमिस मागितलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

अन्नदा डामरे असं त्या चिमुकलीचं नाव आहे. अन्नदा हिनं रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी तिनं काही वेळ मुख्यमंत्र्यांशी संवादही साधला. अन्नदानं मुख्यमंत्र्यांकडे एक अजब प्रॉमिस मागितलं. येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत मला तुम्ही गुवाहाटीला फिरायला घेऊन जायचं हं.. असं प्रॉमिस तिनं एकनाथ शिंदे यांच्याकडे मागितलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील गुवाहाटीला कामाख्या मंदीरात देवीचं दर्शन करायचं ना? असंही तिला म्हटलं. साधलेल्या संवादादरम्यान तुम्ही मदत करता तशी आपणही मदत केली तर मलाही मुख्यमंत्री होता येईल का? असा प्रश्नही तिनं एकनाथ शिंदे यांना विचारला. तसंच यापूर्वी मला फक्त नरेंद्र मोदी हेच आवडायचे पण आता धर्मवीर पाहिल्यापासून मला तुम्हीही आवडायला लागलात असंही अन्नदानं त्यांना सांगितलं. अन्नदा ही रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज आणि ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल इथं आपलं शिक्षण घेत आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ