VIDEO - दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 17:11 IST2017-10-07T16:59:58+5:302017-10-07T17:11:00+5:30

दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे.

VIDEO - found on the shores of Dapoli but, breaking the fuselage but fleeing into the sea | VIDEO - दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

VIDEO - दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. मगर पकडण्यासाठी फास लावण्यात आला. मात्र फास तोडून मगर पुन्हा समुद्रात  पळाली.  

ही मगर सुमारे 12 ते 15 फूट लांब होती . तिची ताकद जास्त असल्याने वन कर्मचाऱ्याला झटका देऊन ती फास तोडून पळाली. दिवसभर तिचा शोध सुरू होता. मात्र उशिरापर्यंत ती समुद्रातून बाहेर पडली नाही. ही मगर गोड्या पाण्यातील असल्याने ती कुठेतरी किनारी बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध अजून सुरूच आहे.

Web Title: VIDEO - found on the shores of Dapoli but, breaking the fuselage but fleeing into the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.