Video:पिंपरीमध्ये भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग
By Admin | Updated: April 19, 2017 00:03 IST2017-04-19T00:03:23+5:302017-04-19T00:03:41+5:30
ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 18 - कुदळवाडी येथील भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग लागली असून, घटनास्थळावर पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन ...

Video:पिंपरीमध्ये भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - कुदळवाडी येथील भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग लागली असून, घटनास्थळावर पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलासह तसेच टाटा मोटर्स अग्निशमन दल यांच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी निगडी पोलिस चौकिचे वरिषठ पोलिस निरिक्षक विजयकुमार पळसुले, पुणे पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे शंकर औताडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी उपस्थित असून खबरदारिच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांचे लोंढे येत आहेत. संध्याकाळी ९.च्या सुमारास कुदळवाडी येथील नियाज सिध्दिकी, शमसुद्दीन सिद्धीकी, बाबुराजा रहमानी यांच्या एकापाठोपाठ एक असलेल्या भंगाराच्या गोदामास आग लागली असून , गोदामात प्लास्टिक, तसेच लाकडी भंगार तसेच इतर कचरा असल्याने आग आटोक्यात आणने अवघड होत आहे. तसेच घटनास्थळी नगरसेवक राहूल जाधव आणि कुंदन गायकवाड उपस्थित होते.
https://www.dailymotion.com/video/x844vty