VIDEO: व्यापा-यांचा लिलावावर बहिष्कार

By Admin | Updated: July 30, 2016 22:03 IST2016-07-30T22:03:05+5:302016-07-30T22:03:05+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत व्यापा-यांनी शनिवारी संध्याकाळी लिलावावर बहिष्कार टाकला

VIDEO: Exclusions on the bidders' lien | VIDEO: व्यापा-यांचा लिलावावर बहिष्कार

VIDEO: व्यापा-यांचा लिलावावर बहिष्कार

>ऑनलाइन लोकमत -
बाजार समिती : दोन तास लिलाव ठप्प
पंचवटी (नाशिक), दि. 30 - शेतक-यांकडून जास्तीच्या जुडय़ा स्विकारू नये, असा आदेश नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने दिल्यानंतर प्रत्येक वकलावर जास्तीच्या जुडय़ा घेतल्या जात असल्याची तक्रार एका शेतक-याने केली. त्यानंतर समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत व्यापा-यांनी शनिवारी संध्याकाळी लिलावावर बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन तास लिलावाची प्रक्रिया ठप्प पडली होती.
 
शनिवारी सायंकाळी लिलाव होण्याच्या पुर्वी कोणीतरी एका शेतक-याने व्यापारी जास्तीच्या जुडया घेतात अशी तक्रार  केल्याने बाजारसमितीने व्यापा-यांनी जास्तीच्या जुडया घेऊ नये, असे सांगताच व्यापा-यांनी एकजुटीने लिलाव बंद पाडले. शेतकर्यांनी आणलेल्या जुडया लहान मोठया असल्याने व्यापारी शेतकर्यांकडून जास्तीच्या आठ ते दहा जुडया घेतात.पुणे,खेड,मंचर येथील बाजारसमितीमध्येही अशाच प्रकारे व्यापा:यांकडून जुडया घेतल्या जात असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
 
शनिवारी दोन तास लिलाव प्रक्रिया ठप्प पडल्याने शेतमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेकडो शेतकर्यांना ताटकळत बसावे लागले होते. अखेर सायंकाळी बाजारसमती कार्यालयात व्यापारी, शेतकरी, आडते व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर शेतकर्यांचे नुकसान नको म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजारसमती घटकांना विनवणी केली. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच जास्तीच्या जुडया घेण्याच्या बोलीवर व्यापार्यांनी लिलावात सहभागी होऊन लिलाव सुरू केल्याने तूर्तास वाद मिटला. 
 
जुडयांना विरोध नाही 
बाजारसमतिीत शेतमालाच्या वकलावर व्यापारी अनेक वर्षापासून जास्तीच्या जुडया घेतात. व्यापारी जास्तीच्या जुडया घेत असले तरी त्याला विरोध नसल्याचे काही शेतकर्यांनी बोलून दाखिवले.

Web Title: VIDEO: Exclusions on the bidders' lien

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.