VIDEO: फोटो काढण्याच्या नादात 60 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 22:01 IST2016-07-23T17:38:45+5:302016-07-23T22:01:43+5:30

फोटो काढण्याच्या उत्साहात आंबोली घाटात 60 फूट खोल दरीत कोसळून रुद्राप्पा विठ्ठल बजेरी तरुणाचा मृत्यू झाला आहे

VIDEO: The death of a young man collapses in a 60-feet deep grave | VIDEO: फोटो काढण्याच्या नादात 60 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

VIDEO: फोटो काढण्याच्या नादात 60 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत - 
सावंतवाडी, दि. 23 - धोक्याच्या ठिकाणी फोटो काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. फोटो काढण्याच्या उत्साहात आंबोली घाटात 60 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुद्राप्पा विठ्ठल बजेरी (19 वर्ष) असं त्याचं नाव असून तो बेळगावचा रहिवासी होता. पूर्वीचा वस परिसरात ही घटना घडली असून रुद्राप्पा विठ्ठल बजेरी कॉलेज विद्यार्थी होता.
 
रुद्राप्पा आपल्या मित्रांसहित पिकनिकसाठी आंबोली घाटात आला होता. त्यावेळी फोटो काढण्याच्या नादात धबधब्याजवळ पाय घसरल्याने रुद्राप्पा 60 फूट खोल दरीत कोसळला. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दुपारी रुद्राप्पाचा मृतदेह सापडला. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठविण्यात आला आहे.
 

Web Title: VIDEO: The death of a young man collapses in a 60-feet deep grave