VIDEO : कोल्हापुरकरांच्या गर्दीनेच लोकमत शॉपिंग उत्सवाची सांगता
By Admin | Updated: January 9, 2017 20:57 IST2017-01-09T20:57:35+5:302017-01-09T20:57:35+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 09 - कोल्हापुरकरांची खरेदीची हौस पुरवणा-या लोकमत शॉपिंग उत्सवाची सोमवारी (दि.9) हाऊसफुल्ल गर्दीतच सांगता झाली. ...

VIDEO : कोल्हापुरकरांच्या गर्दीनेच लोकमत शॉपिंग उत्सवाची सांगता
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 09 - कोल्हापुरकरांची खरेदीची हौस पुरवणा-या लोकमत शॉपिंग उत्सवाची सोमवारी (दि.9) हाऊसफुल्ल गर्दीतच सांगता झाली. हा अखेरचा दिवस साधत ग्राहकांनी मनपसंत वस्तूंची खरेदी आणि विविध पदार्थांवर ताव मारत उत्सवाला निरोप दिला. चार दिवस रंगलेला हा उत्सव आनंददायी असल्याबद्दलच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
ग्राहकांना खरेदीसह हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी देणा-या, डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या उत्सवाचा सोमवारचा अखेरचा दिवस होता. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उच्च मध्यमवर्गीयांपासून ते सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात वस्तूंची खरेदी-विक्री. त्यामुळे येथे प्रत्येक कुटुंबांला आवडीच्या निवडीच्या आणि चैनीच्या वस्तूंच्या खरेदीला वाव होता. अखेरच्या दिवसाची संधी साधत सकाळपासूनच कोल्हापुरकरांनी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.