VIDEO : दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये पंडित जयतीर्थ मेवुंडींचे शास्त्रीय गायन

By Admin | Updated: November 1, 2016 14:12 IST2016-11-01T07:56:23+5:302016-11-01T14:12:48+5:30

दीपावली निमित्त सुरु असलेली विविध मान्यवर गायकांच्या सुरेल गायनाची मेजवानी नाशिकमध्ये ठिकठिकाणी सुरूच आहे.

VIDEO: Classical singing of Pandit Jayitirtha Mavundi in Nashik on the occasion of Diwali | VIDEO : दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये पंडित जयतीर्थ मेवुंडींचे शास्त्रीय गायन

VIDEO : दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये पंडित जयतीर्थ मेवुंडींचे शास्त्रीय गायन

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १ -   दीपावली निमित्त सुरु असलेली विविध मान्यवर गायकांच्या सुरेल गायनाची मेजवानी नाशिकमध्ये ठिकठिकाणी सुरूच असून गंगापुर रोड़वरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात प्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायना झाले. 
सुरेल भाऊबीज पहाट म्हणून होत असलेल्या या कार्यक्रमास दर्दी श्रोत्यांची गुलाबी ठंडीतही गर्दी लोटली आहे. भाजपाच्या आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दरम्यान भाभा नगर येथेही भाऊबीज पहाट कार्यक्रमास प्रारंभ झाला असून जसराज जोशी, संजय गिते यांच्या गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभत आहे. माजी आमदार वसंत गीते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यंदा दीपावली व पाडव्यानिमित्त नाशिकात अर्शद अली खा, पंडित यशवंतबुवा जोशी, अजित कडकडे,  प्रसन्नजीत कोसंबी, प्रांजली बिरारी नेवासकर, ओंकार दादरकर, रागिणी कामतीकर, रोहित राउत व् जुईली जोगळेकर  आदि गायकांच्या ठिकठिकाणी मैफीली झाल्या आहेत.

Web Title: VIDEO: Classical singing of Pandit Jayitirtha Mavundi in Nashik on the occasion of Diwali