VIDEO : पिलांना वाचवण्यासाठी कोंबडीने दिली मोराशी झुंज
By Admin | Updated: July 30, 2016 13:08 IST2016-07-30T13:08:11+5:302016-07-30T13:08:43+5:30
आपल्या पिलांना मोरापासून वाचवण्यासाठी कोंबडीने झुंज देत त्याला पळवून लावले.

VIDEO : पिलांना वाचवण्यासाठी कोंबडीने दिली मोराशी झुंज
रमेश देसले
ऑनलाइन लोकमत
ठेंगोडा (नाशिक), दि. ३० - बागलाणच्या आदिवासी पट्यात मोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसुन येते. डोंगराळ व निसर्गरम्य वातावरण यामुळे परीसरात फेरफटका मारायला गेले तरी असख्य मोरांचे दर्शन घडते. आदिवासी बांधवाच्या पाळीव कोंबड्यामध्ये हे मोर सहज रममाण होतात. अशाच एका दृष्यात कोंबडी आपल्या पिंलासह फिरत असतांना मोराची नजर तिच्या लहान पिल्लावर गेली आणि तो त्यांना मटकावण्यासाठी पुढे झेपावला. कोंबडीचे पिल्लू आपल्या चोचीत पकडण्यासाठी मोराने अनेकदा प्रयत्न केले माञ मोराच्या मानाने अगदी लहान असलेल्या कोंबडीतील मातृत्व जागे झाले आणि आपल्या पिलांना वाचविण्यासाठी कोंबडीने आपल्या पिल्लाना आपल्या पंखाखाली कवटाळले व मोरावर गुरगुरत मोठ्या हिमतीने आपल्या पिलांना वाचविले. मोरानेही अखेर कोंबडीपुढे हार मानली आणि तो दुसऱ्या भक्षाच्या शोधात निघुन गेला.