VIDEO- भाजपा उमेदवार यादी उद्या होणार जाहीर- गिरीश महाजन

By Admin | Updated: January 30, 2017 19:43 IST2017-01-30T18:33:58+5:302017-01-30T19:43:48+5:30

राजू ठाकरे/ ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 30 - मनपा निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून, संघटनमंत्री किशोर काळकर आणि ...

VIDEO: BJP candidate list to be announced tomorrow - Girish Mahajan | VIDEO- भाजपा उमेदवार यादी उद्या होणार जाहीर- गिरीश महाजन

VIDEO- भाजपा उमेदवार यादी उद्या होणार जाहीर- गिरीश महाजन

राजू ठाकरे/ ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 30 - मनपा निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून, संघटनमंत्री किशोर काळकर आणि सहकाऱ्यांनी सदर यादी वरिष्ठांकडे सुपूर्द केल्यानंतर आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.

मात्र ही उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात असून आज रात्रीपर्यंत नाशिकमधील सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टी नाशिकमधील मनपा निवडणूक उमेदवारांची यादी उद्या ( ३१) रोजी जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकमतशी बोलताना दिली.

ते आज पहाटेपासून नाशिकमध्ये एका गोपनीयस्थळी तळ ठोकून आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी मनपा निवडणुकीत जास्तीत जास्त कुठले उमेदवार निवडून येतील याविषयी माहिती जाणून घेऊन अशा उमेदवारांची यादी महाजन तयार करीत आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपा संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा.देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गीते, डॉ.प्रशांत पाटील, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.

https://www.dailymotion.com/video/x844q6q

Web Title: VIDEO: BJP candidate list to be announced tomorrow - Girish Mahajan