शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Video : पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 18:46 IST

पोकलेन मशीन आदळली जमिनीवर. मोठा आवाज झाल्यानं परिसरात उडाला गोंधळ

ठळक मुद्देपोकलेन मशीन आदळली जमिनीवर. मोठा आवाज झाल्यानं परिसरात उडाला गोंधळ.

बीड : परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यात रविवारी दुपारी राखेच्या ढिगाऱ्यावर अडकलेली पोकलेन मशीन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना झाला अपघात. वजन अनियंत्रित झाल्याने क्रेनसह पोकलेन मशीन उंचावरून जमीनीवर आदळली. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही. क्रेन चालकाचे  दैव बलवत्तर म्हणायची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दोन दिवसापूर्वीच पांगरी येथे राख वाहन चालकांना महिलेने चप्पलने चोप दिल्याचा व्हायरल झाला होता. प्रकार ताजा असताना रविवारी क्रेन व पोकलेन मशीन उंचावरून खाली आदळल्याचा व्हिडीओ वायरल झाला. हा प्रकार परळीजवळील राख बंधारा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते आहे. परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील राख तळ्यात दररोज २०० गाडी भरून राख घेऊन जात आहेत.  ही राख ढिगाऱ्यातून हायवा  मध्ये टाकण्यासाठी पोकलेन मशीनचा वापर केला जातो. या परिसरात पन्नासच्यावर पोकलेन मशीन आहेत. त्यापैकी एक पोकलेन मशीन  राखेच्या ढिगावर अडकली. ही पोकलेन मशीन खाली घेण्यासाठी क्रेन मशीन आणण्यात आली आणि या क्रेनच्या सहाय्याने पोकलेन मशीन खाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र वजन सहन न झाल्याने पोकलेन मशीन व क्रेन दोन्ही जमिनीवर आदळल्या. यात नुकसान काही कोणाचे झाले नाही परंतु या परिसरात असणारे कामगार हादरून गेले.  सुदैवाने काही झाले नाही. राख तळ्याकडे कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याने सर्व काही बेबंदपणा चालू आहे. राख व्यवसायिक  राखेची वाहतूक बेफामपणे करत असून  शहर व परिसरात प्रदूषण वाढले आहे. त्यातच अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातSocial Mediaसोशल मीडिया