शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या निकषात विदर्भ नापास! पुणे विद्यापीठाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या...

 - गणेश वासनिक 

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या लेखी विदर्भातील ‘युनिव्हर्सिटी’ नापास आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूरचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अँड युनिव्हर्सिटी  आणि  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशी एकूण नऊ विद्यापीठे आहेत. केंद्र सरकार देशातील १० शासकीय व १० खासगी अशा २० विद्यापीठांना जागतिक दर्जाचे बनविणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या विद्यापीठांना १० हजार कोटींचे अनुदान केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठांकडून १२ डिसेंबरपूर्वी प्रस्ताव मागविले आहेत. राज्यातून पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या यादीत स्थान मिळविण्यासाठी विशेष तयारी केली असून, या प्रक्रियेत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केंद्राशी संवाद साधल्याची माहिती कुलसचिव ए.डी. शाळीग्राम यांनी दिली. विद्यापीठाने इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅसेसमेंट सेल (आयक्यूएसी) च्या माध्यमातून विद्यापीठातील सोई-सुविधांचे आॅडिट केल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले. राज्यातील एकूण २७ विद्यापीठांपैकी विदर्भात नऊ विद्यापीठ आहेत. असे असताना विदर्भातील एकाही विद्यापीठाला प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. 

योजनेसाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले नाही. किमान स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तरी मिळायला हवी. - मुरलीधर चांदेकर कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

मध्य भारतात नागपूर विद्यापीठ सर्वात जुने आहे. ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून कोणतेही पत्रव्यवहार झालेला नाही.- सिद्धार्थविनायक काणे कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठGovernmentसरकारIndiaभारत