ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २८ - विदर्भातील कलाकारांची मांदियाळी मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आहे. यात अभिनय, दिग्दर्शन, संगीत, छायाचित्रण, लेखन करणारे अनेक प्रतिभावंत आहेत. कधी एकमेकांची भेट झाली किंवा कधी फोन आला तर हे लोक आपल्या वैदर्भिय भाषेत बोलायला लागतात. पुरस्कार सोहळे, इव्हेन्टसमध्ये हे एकमेकांना भेटतात तेव्हा, 'पुन्हा लवकरच भेटू या ना बे' असे म्हणून ते निरोप घेतात. पण हा 'लवकर' कधी येत नसतो. याच 'लवकर'ला खेचून आणले नरेंद्र मुधोळकर, पराग भावसार आणि उल्हास फाटे यांनी. आणि २३ जुलै रोजी समस्त विदर्भातील प्रतिभावन चित्रकर्मींचे स्नेहसंमेलन मुंबईत पार पडले.यावेळी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर चित्रपट विभागात पुरस्कार आणि नामांकने मिळवणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये समृद्धी पोरे, दिग्दर्शिका ( मला आई व्यायचे आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ) महेश आणे, छायाचित्रण (स्वदेश ) शंतनू रोडे दिग्दर्शक ( जय जयकार आणि संवाद बाबू बँड बाजा ) समिधा गुरु, अभिनय ( कापूस कोंड्याची गोष्ट) बाबा खिरेकर रंगभूषा (तानी) नाना आंबुलकर, रंगभूषा (ख्वाडा ) अजय ठाकूर, निर्माता नामांकन (तानी ) गायत्री कोलते, कथा (तानी ) अशोक लोखंडे, अभिनय (युगपुरुष यशवंत राव चव्हाण ) माधुरी अशिरगडे, लेखक (आई शप्पथ ) नरेश भोईर आणि अजय बोढारे निर्माते नामांकन (ती) मिलिंद उके, निर्माता दिग्दर्शक (देवकी ) आणि भारत गणेशपुरे, अभिनय नामांकन (वाघेऱ्या )
विदर्भातील चित्रकर्मींचा 'कल्ला' !
By admin | Updated: July 28, 2016 18:40 IST