विदर्भात ८१ रुग्णवाहिका नादुरुस्त!
By Admin | Updated: July 19, 2014 00:52 IST2014-07-18T23:50:03+5:302014-07-19T00:52:26+5:30
आरोग्य खात्याचा अहवाल : रुग्णसेवेवर परिणाम

विदर्भात ८१ रुग्णवाहिका नादुरुस्त!
नीलेश शहाकार/बुलडाणा
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालविल्या जाणार्या विदर्भातील विविध रुग्णालयांमधील एकूण रुग्णवाहिकांपैकी सुमारे नऊ टक्के रुग्णवाहिका अपघातांमुळे नादुरुस्त असल्याचे विभागाच्याच अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरात विविध रुग्णालय चालविली जातात. अत्यवस्थ रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत; मात्र रुग्णवाहिकांच्या मागेही अपघाताचे दुखणे लागल्यामुळे, विदर्भातील ९९१ पैकी ८१ रुग्णवाहिका अडगळीत पडून आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या जानेवारी ते मार्च २0१४ या कालावधीतील अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
विदर्भातील ११ जिलंत एकूण ६४२ रुग्णालये आहेत. यांच्या दिमतीला ९९१ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहे; मात्र त्यापैकी बर्याच रुग्णवाहिका अपघातांनंतर नादुरुस्त अवस्थेत अडगळीत पडून असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिमाण होत आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील रुग्णांना, जनतेला वैद्यकीय मदत पुरविण्यामध्ये रुग्णवाहिकांची मोठी भूमिका असते; मात्र दुर्गम आणि डोंगराळ भागांचा समावेश असलेल्या बुलडाणा, अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमधील रुग्णवाहिकांची स्थिती गंभीर आहे. बुलडाण्या जिल्ह्यात ८, अमरावती मध्ये १५ आणि गडचिरोलीत १६ रुग्णवाहिका अपघातामुळे नादुरुस्त आहे. या रूग्णवाहिकांची दूरूस्ती न केल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
.
जिल्हा रुग्णवाहिका बंद
नागपूर ८७ 0४
वर्धा ५२ 0६
अमरावती १२६ १५
अकोला ६0 0८
बुलडाणा १0१ 0८
वाशिम ४0 0२
यवतमाळ ९७ 0४
चंद्रपूर १९७ 0६
भंडारा ६३ 0४
गडचिरोली ९५ १६
गोंदिया ७३ 0८