शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा विजय अन् संघाचे गणित, जागा घटण्याचे केले होते भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:04 IST

गुजरातमध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आला असला तरी जागांच्या शंभरीचा आकडा गाठताना पक्षाची दमछाक झाली. मतदानचा टक्का घसरल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल; मात्र जागा घटतील, असा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून समोर आला होता.

योगेश पांडे नागपूर : गुजरातमध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आला असला तरी जागांच्या शंभरीचा आकडा गाठताना पक्षाची दमछाक झाली. मतदानचा टक्का घसरल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल; मात्र जागा घटतील, असा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून समोर आला होता.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिका-यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते.भाजपच्या पदाधिकाºयांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाºयांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते.भाजप आमदारांचा आनंदोत्सवगुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे. देशातील जनता भाजपासोबत असून पंतप्रधानांचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017