प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

By Admin | Updated: July 27, 2016 17:09 IST2016-07-27T17:09:18+5:302016-07-27T17:09:18+5:30

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.

The victim's assault on the suspicion of love affair | प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांचा जमाव जमल्याने पोलिसांनी धाव घेत तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, समाजात नामुश्की नको म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देऊन सोडून देण्यात आले.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलीजवळ गेल्या तीन दिवसापासून मोबाईल होता. तो मोबाईल बुधवारी तिच्या पालकांच्या नजरेस पडला. त्याबाबत तिला जाब विचारला असता तिने एका तरुणाचे नाव सांगितले. त्यानेच हा मोबाईल दिल्याचे सांगितले, मात्र तो मैत्रिणीसाठी दिल्याचेही तरुणीने सांगितले. मोबाईल प्रकरणामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संबंधित तरुणाला आर.आर.शाळेजवळ गाठले. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी झाली होती.

मुलीला त्रास देतो या कारणावरुन तिच्या वडिलांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. संतापात काहीही घडना घडू शकते याचा अंदाज आल्याने काही लोकांनी तरुणाला सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले. आपसात समझोता करून वाद मिटवण्यात आला.

Web Title: The victim's assault on the suspicion of love affair