कुलगुरुपदाचा तिढा अजूनही सुटेना
By Admin | Updated: March 19, 2015 23:51 IST2015-03-19T22:03:25+5:302015-03-19T23:51:12+5:30
१९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली

कुलगुरुपदाचा तिढा अजूनही सुटेना
शिवाजी गोरे - दापोली--देशातील कृषी विद्यापीठातील नंबर वनचे दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नसल्यसाने परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू प्रभारी कुलगुरु म्हणून दापोली कृषी विद्यापीठाचा गाडा हाकत आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा घोळ कायम असल्याने तिढा सुटता सुटेना.कोकणच्या कृषी विकासाला गती देण्यासाठी दापोली येथे १९७२ साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कषी विद्यापीठ स्थापन झाले. कृषी विद्यापीठाने ५० वर्ष पूर्ण केली. या विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात देशात अनेक विक्रम केले आहेत. देशातील नामवंत कृषी विद्यापीठाला कुलगुरु मिळू नये, याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन कुलगुरु लवांडे यांचा कार्यकाळ १९ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होत होता. १९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली. आॅगस्ट महिन्यात माजी न्यायमूर्ती पटेल यांचे अध्यक्षतेखाली निवड कमिटी स्थापन करण्यात आली. दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या जाहिराती वरुन पात्र उमेदवाराने अर्ज केले. ठरल्याप्रमाणे उमेदवाराची अर्ज छाननी व मुलाखती झाल्या. कुलगुरु पदासाठी अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी अर्ज केले होते. यापूर्वीसुद्धा दोन तीन मुलाखती अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यापैकी एखाद्या पात्र उमेदवाराची निवड होणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही झाले. अंतिम मुलाखतीच्या उमेदवारांना काहीही कळवण्यात आले नसल्याचे पुढे येत आहे. ज्या दिवशी नवीन कुलगुरुने डॉ. लवांडे यांच्याकडून चार्ज घेणे गरजेचे होते. त्या दिवशी संध्याकाळी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांचे प्रभारी चार्ज सोपवण्याचे आदेश आले. कुलगुरु पदासाठी पात्र उमेदवार नव्हता, तर त्यांचे अर्ज अपात्र का ठरवण्यात आले नाहीत, त्यांचा मुलाखती का घेण्यात आल्या, शेवटच्या पाच उमेदवारांना अपेक्षा होती परंतु त्यापैकी कोणाचीही निवड न करता त्यांची चेष्टा केल्याचा प्रकार घडला. ते जर पात्र नव्हते तर मुलाखती का घेतल्या, पात्र होते तर त्यापैकी एकाची निवड का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता नसल्याने कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुलगुरु पदाचे निकष बदलण्याचा विचार शासन करत आहे. कुलगुरु पदाचे निकष बदलण्यापूर्वी मग भरतीच का घेतली गेली, नॉट फाऊंड सुटेबल अशा शेरा का मारला गेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.