मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा स्वीकारला
By Admin | Updated: August 9, 2016 19:51 IST2016-08-09T19:51:18+5:302016-08-09T19:51:18+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा स्वीकारला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. साळुंके यांनी १९ जुलै रोजी वैयक्तिक कारण देत कुलगुरूपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे राजभवनातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात सांगण्यात आले आहे.