ज्येष्ठ अभिनेते शेखर नवरे यांचे निधन
By Admin | Updated: January 12, 2016 15:21 IST2016-01-12T13:23:58+5:302016-01-12T15:21:04+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी शेखर नवरे (वय ५८) यांचे काल रात्री निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते शेखर नवरे यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - ज्येष्ठ रंगकर्मी शेखर नवरे (वय ५८) यांचे काल रात्री निधन झाले. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
व्यवसायाने डॉक्टर असलेले नवरे यांनी अभिनयाच्या क्षेत्रातही खूप नाव कमावले. 'राजा इडिपस', ' तू फक्त हो म्हण', ' एक होता शहाणा', ' वेटिंग फॉर गोदो' या नाटकांतून त्यांनी केलेल्या विविध भूमिका गाजल्या. तसेच त्यांनी सिंहासन, माझं काय चुकलं आणि गडबड घोटाळा या चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या.