वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ताशी ८0 किमी वेगाने धावणार

By Admin | Updated: June 30, 2016 04:32 IST2016-06-30T04:32:16+5:302016-06-30T04:32:16+5:30

अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचा (मेट्रो १) वेग वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला

Versova-Ghatkopar Metro will run at 80 km / h | वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ताशी ८0 किमी वेगाने धावणार

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ताशी ८0 किमी वेगाने धावणार


मुंबई : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोचा (मेट्रो १) वेग वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार ताशी ८0 किमी वेगाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून परवानगी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी २ जुलैपासून केली जाईल, अशी माहिती मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आली. मेट्रोच्या प्रत्येक राउंड ट्रिपमागे (जाणे-येणे) ३0 सेकंदांची बचत होईल आणि त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल.
आरडीएसओकडून आणि सुरक्षा आयुक्तांकडून या मेट्रोच्या वेगाची चाचणी करण्यात आली होती. मेट्रोची चाचणी घेताना ती ताशी ८0 किलोमीटर वेगाची घेण्यात आली. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी ५0 किलोमीटर वेगाची देण्यात आली होती. मार्च २0१६ रोजी मेट्रो ताशी ६५ किलोमीटरपर्यंत चालवण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाकडून पुन्हा ताशी ८0 किमी वेग वाढवण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि तो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर केला. मात्र आयुक्तांकडून अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अखेर सगळी माहिती सादर केल्यानंतर २0१५ च्या अखेरीस ताशी ८0 किमी वेगाला परवानगी देण्यात आली. त्या परवानगीचे प्रमाणपत्र मात्र अद्यापही मिळाले नव्हते. अखेर ते मिळाल्याची माहिती मेट्रोकडून मिळाली. (प्रतिनिधी)
।मेट्रो वक्तशीर
जून २0१६ पर्यंत मुंबई मेट्रो वनमधून आतापर्यंत १९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. जवळपास ७५0 फेऱ्या मेट्रोच्या होतात. सुटीच्या दिवशी मेट्रोतून ३ लाख २0 हजार प्रवासी प्रवास करतात. मेट्रोे शंभर टक्के वक्तशीरही आहे.

Web Title: Versova-Ghatkopar Metro will run at 80 km / h

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.