शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या रवींद्रचा असाही छंद, परदेशी पर्यटकांसोबत जुळताहेत बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 08:41 IST

सर्वसामान्य माणसाला परदेशातील पर्यटनस्थळाचं मोठं आकर्षण असतं. त्याठिकाणी जाणं सर्वांनाच शक्य होत नाही. अशात तेथून नेणाऱ्या पर्यटकांना भेटून त्यांच्यासोबत बंध जोडला जावा असा प्रयत्न करणारेही कमी नाहीत, यातीलच एक व्यक्ती म्हणजे नंदुरबारचे रवींद्र पाटील. 

- नरेंद्र गुरवनंदुरबार  - सर्वसामान्य माणसाला परदेशातील पर्यटनस्थळाचं मोठं आकर्षण असतं. त्याठिकाणी जाणं सर्वांनाच शक्य होत नाही. अशात तेथून नेणाऱ्या पर्यटकांना भेटून त्यांच्यासोबत बंध जोडला जावा असा प्रयत्न करणारेही कमी नाहीत, यातीलच एक व्यक्ती म्हणजे नंदुरबारचे रवींद्र पाटील. परदेशी पर्यटकांसोबत मैत्री ठेवत त्यांच्या स्मृती म्हणून परदेशी चलनी नोटांचा त्यांचा संग्रह ग्रामीण भागात आकर्षण आहे.प्रकाशा, ता़ शहादा येथे कृषी साहित्य विक्री करणारे रविंद्र पाटील हे नंदुरबार येथील रहिवासी आहेत़ बालपणापासून त्यांना विविध देशांची माहिती गोळा करण्याचा छंद होता़ आपणही कधीतरी या देशांना भेटी देणार म्हणून ते हा छंद जोपासत होते़ परंतू वाढत्या वयानुसार त्यांचा हा छंद मागे पडला़ परंतु कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना बºयाच वेळा ठिकठिकाणी फिरस्तीचा योग आला़ देशातील तीर्थ आणि पर्यटनस्थळांवर भेटी देत असताना त्यांच्या मनातील जुन्या छंदाने उचल खाल्ली, परंतु आता परदेशात जाण्यापेक्षा तेथील चलनी नोटा गोळा करुयात म्हणून त्यांनी परदेशी नागरिकांसोबत मैत्री करत भारतीय रुपयाच्या बदल्यात त्या देशातील चलनी नोटा मागितल्या. यात सुरुवातीला यश आले नाही, भाषा अडसर ठरली, यावर मात करत त्यांनी समजण्या-बोलण्यापुरते इंग्रजी शिकून संवाद साधण्यास सुरुवात केली यातून मग त्यांची चीन, जपान, रशिया, थायलंड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, फिलिपिन्स, कॅनडा, सौदीअरेबिया, नायजेरिया, फ्रान्स आणि इंग्लंडमधील पर्यटकांसोबत संवाद साधला़ साहित्य खरेदी किंवा फिरस्तीला गेल्यास पर्यटकांचा शोध घेत त्यांच्या मैत्री करतात. यातून त्यांच्याकडून त्यांच्या देशातील चलनी नोटांची मागणी करतात. बदल्यात भारतीय नोटा देऊन टाकतात़ त्यांच्या मैत्रीपूर्ण संवादाने ब-याच जणांनी आठवण म्हणून नोटा भेट दिल्या आहेत. 

 एका ब्रिटीश पर्यटकाने तर त्यांना नेपाळ, श्रीलंका, भूतान या देशांच्याही नोटा भेट दिल्या होत्या़ या सर्व चलनी नोटा त्यांनी दुकानावरच काचेचा खाली या नोटा ठेवल्या आहेत. येणा-या प्रत्येक ग्राहकाला त्या दिसतात. ग्राहकदेखील त्यांच्या या छंदाचे कौतुक करतात. १४ वर्षापासून त्यांचा हा छंद सुरू असून आतापर्यंत त्यांच्याकडून ३० पेक्षा अधिक देशांच्या नोटांचे संकलन झाल्याची माहिती आहे़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रJalgaonजळगावJara hatkeजरा हटके