शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

वाहनधारकांना 'चॉईस' क्रमांकासाठी मोजावी लागणार आता दुप्पट किंमत! 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 11, 2020 14:24 IST

आता हटके क्रमांक मिळवण्यासाठी पंगतीत असणाऱ्यांसाठी थोडे टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

पुणे : प्रत्येक जण दुचाकी किंवा चारचाकीसह कुठलेही वाहन खरेदी करताना प्रचंड उत्साही असतो. त्यातच आपल्या सवारीचा नंबर खास असावा यासाठी हौशे-गवश्यांमध्ये प्रचंड चढाओढ लागलेली असते. काही बहाद्दर तर हाच क्रमांक पाहिजे मिळावा म्हणून कितीही रुपये मोजण्याची तयारीत असतात. एका पट्ठ्याने तर गाडीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे हे फक्त 'खास' नंबरसाठी चुकते केल्याची देखील घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पण आता हटके क्रमांक मिळवण्यासाठी पंगतीत असणाऱ्यांसाठी थोडे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. कारण यापुढे तुम्हाला चॉईस नंबरसाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 

राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. कुठल्याही वाहनाच्या आकर्षक क्रमांकासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात भरघोस वाढ करण्यात आली आहे. पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत ही रक्कम असणार आहे. 'खास' क्रमांक घेण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याने राज्य सरकारला यामधून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. 

राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या नव्या प्रस्तावानुसार ०००१ हा क्रमांक दुचाकीसाठी आता एक लाख व फोर व्हीलरसाठी ५ लाख रुपये मोजावे लागणार आहे. जो या घडीला दुचाकीला ५० हजार रुपये व चारचाकीला ४ लाखांमध्ये मिळतो. परंतू, राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून या हरकती व विचार करून नव्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. 

एकाच नंबरची मागणी वाढली तर असा काढला जातो पर्याय.. एखाद्या हटके नंबरसाठी जर अधिक वाहनधारकांनी डिमांड केल्यास त्याचा लिलाव करण्यात येतो. आणि यावेळी नियोजित करण्यात आलेल्या रक्मेपेक्षा जास्त पैसे मोजलेल्या व्यक्तीला तो क्रमांक मिळतो.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस