शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची चोरी

By admin | Published: August 02, 2016 2:39 AM

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे. रात्री ३ ते सकाळी ७ दरम्यान कामगारच भाजीपाल्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनीही याविषयी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाला चोरी थांबविण्यात अपयश आले आहे. राज्य शासनाने भाजीपाल्याची थेट विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समितीमध्येच संरक्षण मिळत असल्याचा दावा करण्यात आला. शेतकऱ्यांनीही बाजार समित्यांवर विश्वास ठेवून आपला माल तेथेच विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. परंतु वास्तवामध्ये मुुंबई बाजारसमितीमध्येच शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होत असल्याचे निदर्शनास आला आहे. भाजीपाला मार्केटमधील व्यवहार पहाटे तीन वाजता सुरू होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, कर्नाटकवरूनही कृषीमाल विक्रीसाठी येत असतो. कृषी माल खाली करण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे व काही प्रमाणात माथाडी कामगार मालाची चोरी करत आहेत. ४०० ते ५०० कामगार डोक्यावर गोणीचा झोला घेवून मालाची चढ-उतार करत असतात. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेला माल काढून त्या गोणीमध्ये ठेवला जातो. पहाटेपर्यंत अनेकजण ५ ते २५ किलो भाजीपाला काढतात. पूर्वी हा माल साठविण्यासाठी प्रत्येक गाळ्यात पेट्या ठेवल्या जात होत्या. परंतु त्याला आक्षेप घेतल्यामुळे आता कपडे व इतर साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी हा माल ठेवला जातो. यामधील काही मार्केटमध्येच किरकोळ विक्रेत्यांना विकला जातो. उर्वरित माल कामगार घरी घेवून जातात. चोरी केलेल्या मालाची कोपरखैरणे व इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ५, ६, १५ मध्ये रोडवर सायंकाळी भाजीपाल्याची विक्री सुरू असते. यामधील ९० टक्के माल चोरीचा असतो. एपीएमसीमध्ये रोज ५०० ते ६५० ट्रक व टेंपोची आवक होत असते. १८०० ते २२०० टन माल विक्रीसाठी येत असतो. यामुळे कामगारांनी थोडासा माल काढून घेतला तर त्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. परंतु प्रत्येकाने थोडा माल काढला तरी रोज ३ ते ४ टन मालाची चोरी होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ोतकऱ्यांच्या मालाचे वजन कमी भरल्याने साहजिकच त्यांना पैसेही कमी मिळतात. या व्यतिरिक्तही एपीएमसीमधील अनेक वाहनचालक, गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती व इतर कामगारही स्वत:च्या घरी फुकट भाजीपाला घेवून जात आहेत. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू आहे. व्यापारी संघटनांनी याबाबत अनेक वेळा तक्रार केली होती. यानंतर चोरीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्याप ते पूर्णपणे थांबलेले नाही.>व्यापाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या मालाची चोरी थांबविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. या तक्रारीनंतर मार्केटमध्ये चोरीचा माल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला विक्रेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. गाळ्यांमध्ये चोरीचा माल ठेवण्यासाठीच्या पेट्या उचलण्यास लावले आहे. परंतु यानंतरही कामगारांकडून व इतर घटकांकडून होणारी चोरी थांबत नसून यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रामाणिक कामगारांचीही बदनामी भाजीपाला मार्केटमध्ये अनेक माथाडी कामगार प्रामाणिकपणे कृषी मालाची चढ - उतार करण्याचे काम करतात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे व संघटनेनेही शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होवू नये अशा सूचना दिल्याने त्याचे पालन केले जाते. परंतु यानंतरही ४०० ते ५०० कामगारांनी अद्याप चोरी थांबविलेली नाही. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या ठरावीक कामगारांमुळे प्रामाणिक कामगारांचीही प्रतिमा मलिन होत आहे. अशी होते चोरी एपीएमसीमध्ये पहाटे तीन वाजेपासून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. मालाची चढ - उतार करणारे कामगार प्रत्येक गोणीमधून थोडासा माल काढतात व डोक्यावर मागील बाजूला सोडलेल्या झोल्यामध्ये (बारदानाची गोणी ) तो माल टाकला जातो. पहाटेपर्यंत अनेकांकडे ५ ते २५ किलोचा माल जमा होतो. काही जण तेथेच किरकोळ विक्रेत्यांना त्याची विक्री करतात. अनेक जण घरी घेवून जातात व ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात त्याची विक्री करतात. याशिवाय वाहनचालक व इतर अनेक जण घरी वापरण्यासाठीही भाजीपाला घेवून जात आहेत.