वसंतदादा पाटील यांना विधानभवनात आदरांजली

By Admin | Updated: March 2, 2017 05:34 IST2017-03-02T05:34:39+5:302017-03-02T05:34:39+5:30

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

Vasantdada Patil is respected in the Vidhan Bhavan | वसंतदादा पाटील यांना विधानभवनात आदरांजली

वसंतदादा पाटील यांना विधानभवनात आदरांजली


मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
‘आम्ही सांगलीकर’ व इतर संस्थांच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. शिवाजीराव नाईक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. संजयकाका पाटील, माजी खा. प्रतीक पाटील, सचिव उत्तमसिंग चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादांना आदरांजली वाहिली.
वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १३ नोव्हेंबर २०१६ ते १३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vasantdada Patil is respected in the Vidhan Bhavan