शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 14:18 IST

Vasant More Uddhav Thackeray Meet: पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वगृही येताय, पण उशीर केला असे म्हटल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच आपण ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी जाहीर केले. 

मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे होतोय. उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले. आता पक्ष प्रवेश करणार आहे, बाकी चर्चा पुढे होईल, असे वसंत मोरे म्हणाले. तसेच आज नाही तर येत्या ९ तारखेला मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याचे मोरे यांनी जाहीर केले. 

मी मनसे सोडून वंचितमध्ये गेलो होतो. मात्र मतदारांनी मला स्वीकारले नाही, असेही त्यांनी वंचित सोडण्याचे कारण सांगितले. पुण्यात शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीत कडवे आव्हान देणार असल्याचे मोरे म्हणाले. 

विधान सभा लढविणार का या प्रश्नावर मोरे यांनी आता पक्ष प्रवेश करू, नंतर यावर चर्चा करू असे मोरे म्हणाले. तसेच विधासभा लढविण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो. लोकसभेला पुणे शहरात माझे मतदान नव्हते, माझा तो भागही नव्हता. तरीही मला चांगली मते मिळाली आहेत. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. 

मनसे का सोडलेली?वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून कायम चर्चेत राहिले होते. अनेकदा पक्षात राहून वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलनाला वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची तातडीने पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होती. त्यातच वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, मनसेची लोकसभेची भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Vasant Moreवसंत मोरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे