शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Vasant More In Thane: राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या; वसंत मोरे ठाण्यात गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:14 IST

Vasant More full Speech In Thane: पुण्यात एक अँम्बॅसिडरची काच फुटली, महाराष्ट्रात त्याचा आवाज घुमला. लोकांना संकटात मनसेवाले आठवतात, मग निवडणुकीवेळी का नाही, असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरेंनी पाडव्याला मशीदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका मांडली. या भूमिकेवर जाहीर टीका करणारे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या ठाण्यातील उत्तर सभेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोरोना काळात मनसेने काय काय केले, लोकांना तेव्हा मनसे का आठवली, निवडणुकीवेळी का आठवत नाही, असे सांगत नाराजी व्यक्त केली. मात्र, मशीदीच्या भोंग्यावरील भूमिकेवर बोलणे त्यांनी टाळले. 

पुण्यात मनसेने काम केले. गोरगरीबांना फायनान्स, बँका वाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. अशावेळी मनसेची दारे उघडी होती. लोकांना फायनान्स वाला, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाला कुठे जातो, तेव्हा का नाही मनसेवाला आठवत, असा प्रश्न उपस्थित केला. 

राज ठाकरेंची गेल्या तीन महिन्यांपासून तब्येत बिघडलेली आहे. साहेबांना त्रास होतोय हे मी काल पाहिले. त्यांना एकेक पायरी चढण्यासाठी त्रास होत होता. ब्लू प्रिंट साहेबांनी आणली, पुण्यात मनसेचे आम्ही दोनच नगरसेवक आहोत. ती ब्लू प्रिंट कशी राबविली हे कात्रजमध्ये येऊन पहा. शंभरावर नगरसेवकांना जे जमले नाही ते आम्ही दोघांनी केले. पालिकेचा पुरस्कारही मनसेच्या नगरसेवकाला मिळाला, असे वसंत मोरे म्हणाले. 

घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर

सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा किस्साही त्यांनी सांगितला. 

दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

गेल्या चार पाच दिवसांत तुम्ही पाहिले असेल. महाराष्ट्रात एकही पक्ष राहिला नाही ज्याने मला ऑफर दिली नाही. अमेरिकेतील लोकही आपल्याला तिकडे बोलवून घेतील एवढी मनसेचे नगरसेवक कामे करतात, जी काही उत्तरे द्यायची ती राज ठाकरे देतील. माझ्या एकनिष्ठेला तुम्ही जो पाठिंबा दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असे ते म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे