वसई - बाईक धुताना अंगावर पाणी उडालं म्हणून हल्ला

By Admin | Updated: August 23, 2016 11:14 IST2016-08-23T11:14:55+5:302016-08-23T11:14:55+5:30

बाईक धूत असताना अंगावर पाणी पडलं या क्षुल्लक कारणावरुन प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Vasai - Attack as the bike fired with water | वसई - बाईक धुताना अंगावर पाणी उडालं म्हणून हल्ला

वसई - बाईक धुताना अंगावर पाणी उडालं म्हणून हल्ला

>- ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 23 - बाईक धूत असताना अंगावर पाणी पडलं या क्षुल्लक कारणावरुन प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये चार जण जखमी झाले असुन एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
वसईतील शांतीनगरात पीडित व्यक्ती आपली बाईक धूत होती. यावेळी शेजारुन जाणा-या आरोपीच्या अंगावर पाणी उडालं. यावरुन दोघांमध्ये बाचाचबाची झाली, आणि एवढ्याशा क्षुल्लक कारणावरुन त्याने चौघांवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यामध्ये चार जण जखमी झाले असुन त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 
 

Web Title: Vasai - Attack as the bike fired with water