शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कुजबुज!..त्यामुळे भाजपाला मनसेशिवाय पर्याय नाही;  सदिच्छा भेटीमागचं गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 06:39 IST

खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते.

...तर मनसेला पर्याय नाही

लोकसभा निवडणुका येऊ घातल्याने राजकारणात उलथापालथी व्हायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने  भाजप - मनसे युतीची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा फडणवीसांना भेटले आहेत. त्यामुळे आता मनसे नेत्यांच्या भेटीत गुपित काय, या चर्चेवर नेत्यांनी सदिच्छा भेट असे स्पष्टीकरण दिले. सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका राज यांनी घ्यावी, अशी चर्चा आहे. पण, उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याविरोधात सर्व पक्ष एकवटल्याचे वातावरण भाजपलाच निर्माण करायचे असेल तर मनसेला पर्याय उरणार नाही, अशी कुजबुज आहे.

बांबू कुठे कुठे लागतात?

ठाण्यातील नमो सेंट्रल पार्कचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाषणात ठाण्यात बांबूची लागवड करा, अशी सूचना शिंदे यांनी केली. भाषणाच्या ओघात ‘बांबू कधी कधी व कुठे कुठे लागतात’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी करताच श्रोत्यांमध्ये हंशा पिकला. गेले काही दिवस दोन शिवसेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष व महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल या ताज्या घडामोडींचा संदर्भ श्रोत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी जोडला. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाची भूमिका मान्य केली नाही, तर शिवाजी पार्कमध्ये बरेच बांबू आहेत, असे विधान केले होते. 

अजिंक्य तारा कोण?

कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमिनीच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नुकतेच कल्याणमध्ये आले होते. यावेळी कल्याणमध्ये ‘अजिंक्य तारा चमकणार’ असे फलक लावले होते. कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदित्य यांच्या नावाची चर्चा सुरू होती. हा प्रश्न ठाकरे यांना विचारला असता त्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते.

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे