शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजपमध्ये मेगाभरती सुरुच! पडळकर, पावरांनी हाती घेतलं कमळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:49 IST

विधानसभा निवडणुकीआधी पडळकरांची घरवापसी

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपला रामराम केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांना बारामतीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर, काशीराम पावरा यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचं तोंडभरुन कौतुक केलं. गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असं फडणवीस म्हणाले. पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवल्यास यंदा आपण बारामतीही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्त्वाशी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.शिरपूरचे आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये दाखल झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पावरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिश पटेल यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे पटेलदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतदेखील दिले आहे. अमरिश पटेल 2 दिवसात भाजपमध्ये येणार असल्याचं पाटील म्हणाले. आमदार आले की त्यांच्या नेत्यांना यावंचं लागतं, असं विधान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे अमरिश पटेल लवकरच कमळ हाती धरण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील