वाकोला पोलीस पत्नी हत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुलानेच हत्या केल्याचा संशय

By Admin | Updated: May 24, 2017 12:28 IST2017-05-24T08:34:42+5:302017-05-24T12:28:35+5:30

खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कनोरे यांच्या पत्नीची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे

Vakola Police suspect of murdering a separate wife, killing his son | वाकोला पोलीस पत्नी हत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुलानेच हत्या केल्याचा संशय

वाकोला पोलीस पत्नी हत्या प्रकरणाला वेगळं वळण, मुलानेच हत्या केल्याचा संशय

>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 -  शिना बोरा हत्याकांडातील तपास अधिकारी असणारे खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कनोरे यांच्या पत्नीची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या त्यांच्याच मुलगा सिद्धार्थ यानेच केल्याचा संशय वाकोला पोलिसांना आहे. तो अजूनही बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 
सांताक्रूझ पश्चिमेकड़ील प्रभात कॉलनीतील ए जे पार्क मध्ये गनोरे पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धार्थ सोबत राहतात. सिद्धार्थ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मंगळवारी गनोरे यांनी सकाळची शिफ्ट असल्याने लवकर घर सोडले. जाताना त्यांची मुलासोबत भेट झाली. त्याच्याशी संवाद साधुन ते कामावर निघून गेले. रात्री घरी येण्यास त्यांना उशीर झाला. पहाटेच्या सुमारास ते घरी परतले तेव्हा दरवाजा बाहेरुन बंद होता. 
 
 
 

Web Title: Vakola Police suspect of murdering a separate wife, killing his son