वसईत २ कोटी ९४ लाखांची गाडी

By Admin | Updated: April 7, 2017 05:51 IST2017-04-07T05:51:50+5:302017-04-07T05:51:50+5:30

विरार येथील आरटीओ कार्यालयात आज दुपारी २ कोटी ९४ लाख रुपये किमतीच्या परदेशी कंपनीच्या गाडीची नोंदणी झाली.

Vaith 2 crore 94 lakhs car | वसईत २ कोटी ९४ लाखांची गाडी

वसईत २ कोटी ९४ लाखांची गाडी

वसई : विरार येथील आरटीओ कार्यालयात आज दुपारी २ कोटी ९४ लाख रुपये किमतीच्या परदेशी कंपनीच्या गाडीची नोंदणी झाली. आरटीओ कार्यालय सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या महाग गाडीची नोंदणी झाली.
आॅस्टीन मार्टीन या परदेशी कंपनीच्या आलिशान गाडीची किंमत २ कोटी ९४ लाख रुपये आहे. सेंटेक्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावावर तिची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी कंपनीने ५४ लाखांहून अधिक नोंदणी फीसुद्धा भरली. आरटीओ कार्यालय सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त दीड कोटी रुपयांपर्यंतच्या गाडीची नोंंदणी झाली होती. आज आॅस्टीन मार्टीनच्या नोंदणीने नवा रेकॉर्ड झाला आहे. गाडी नोंदणीसाठी आरटीओ आवारात आल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी या गाडीसह सेल्फी काढून घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Vaith 2 crore 94 lakhs car