कोल्हापूर महापौरपदी वैशाली डकरे

By Admin | Updated: July 5, 2015 01:49 IST2015-07-05T01:49:42+5:302015-07-05T01:49:42+5:30

कोल्हापूरच्या ४२व्या महापौरपदी कॉँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालाच्या अधीन राहूनच महापौर

Vaishali Dakare of Kolhapur Mayor | कोल्हापूर महापौरपदी वैशाली डकरे

कोल्हापूर महापौरपदी वैशाली डकरे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ४२व्या महापौरपदी कॉँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालाच्या अधीन राहूनच महापौर निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घोषित केले.
लाचखोरीच्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या माजी महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. आता महापालिकेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत असून, त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार असल्याने डकरे यांना काम करण्यासाठी कसेबसे दोनच महिने मिळतील. दरम्यान, तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्दबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे.

Web Title: Vaishali Dakare of Kolhapur Mayor