शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 20:05 IST

आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील.

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता लसीकरणासाठी लोक स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पण सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला आणखी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली आहे. 

एका पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर ते आले होते. यावेळी ते बोलत होते. टोपे म्हणाले, लसीकरण करणाची मोहीम राबविताना लसींच्या संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा लसींचा साठा मिळाला आहे. तसेच पुढेही आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. पण आरोग्यमंत्री म्हणून सांगतो आहे की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नावे नोंदवून घेतली पाहिजे. ३० कोटी लोकांना लसीकरण करणार आहोत. त्याचा टप्पाही लवकरात लवकर घेण्यात येईल. 

पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना राजेश टोपे म्हणाले, मागील वर्षभरात स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. समृद्ध आरोग्य ही सामान्यांची खरी गरज आहे. आरोग्य विभागात सुधारणेला खूप वाव आहे. विभागाला कायम अपुरा निधी मिळतो. ६ टक्के तरतूद अपेक्षित असताना जीडीपीच्या केवळ १ टक्का तरतूद होते. कमी मनुष्यबळ, रिक्त जागा या आव्हानांचा सामना करत आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी नाही, गांजलेलल्यासाठी असते. प्रत्येकाला संतुष्ट करता आले नाही तरी चांगल्या हेतूने सेवा करता येते. समस्यांना पाठ दाखवली तर त्या पाठीशी लागतात. याउलट, खंबीरपणे सामोरे गेल्यास समस्या कमी होतात. कोरोना काळ हा नफेखोरीचा कालावधी नाही. त्यामुळे चाचण्या, मास्क, प्लझ्मा, इंजेक्शन यांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला. 

आरोग्य सेवा जवळ, परवडणारी आणि स्वीकारार्ह असली पाहिजे. सामान्य लोक लुबाडले जाऊ नयेत. नफेखोरांवर लगाम ठेवण्याचे काम शासनाचे असते. जनहिताचा रथ शासनाला अधिक गतीने पुढे घेऊन जायचा आहे. 

याचा अर्थ कुठे तरी चुकते आहे... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रति आदर आहे. राज्य व देशासाठी त्यांनी चांगले काम आहे. जलसंधारण आणि इतर काम चांगले केली आहेत. मात्र कृषी कायद्यांच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत. याचा अर्थ केंद्र सरकार कुठे तरी चुकत आहे. म्हणून आंदोलनाला महत्व आहे. मनधरणी केली जात आहे ही समाधानाची गोष्ट आहे. तसेच हजारे यांच्या तब्येतीसाठी हितावह आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या