१०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर ५५० रुपये वाचवा; महावितरणची मोठी स्कीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 07:29 IST2022-08-06T07:06:48+5:302022-08-06T07:29:45+5:30
सौर रुफटॉप यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होईल. यंत्रणा उभारणीच्या खर्चाची ३ ते ५ वर्षात परतफेड होईल.

१०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर ५५० रुपये वाचवा; महावितरणची मोठी स्कीम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सौर रुफटॉप योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ग्राहकाला याचा लाभ घेता येईल, असे नियोजन प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने करावे. या कामात हयगय करणाऱ्या एजन्सींवर, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा देतानाच प्रलंबित अर्जांवर कारवाई करा आणि ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्या, असे आदेश महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी भांडुप येथील रुफटॉप सौर ऊर्जाबाबत घेतलेल्या बैठकीत दिले.
छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होते तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज विकत घेतली जाते.
हाऊसिंग सोसायटीस व अशा इतर ठिकाणी शिबिर घेऊन योजनेबाबत माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे. झोपडपट्टी असलेल्या भागात जनजागृती केल्यास वीज बिल कमी येईल. ग्राहकांना फायदा होईल.
घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून वित्त साह्य देण्यात येणार आहे.
अ) रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी
सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना
२०%
अनुदान रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या संकतेस्थळावर आहे.
१० ते १०० किलोवॅटसाठी
३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत