शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

यूपीएससीत महाराष्ट्राचा दबदबा!

By admin | Updated: July 5, 2015 03:09 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. पुण्यातील अबोली नरवणे हिने राज्यात प्रथम कमांक पटकावला आहे. देशपातळीवर ती ७८व्या क्रमांकावर आहे. अबोली सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहे. स्वप्निल टेंबे, अभिजित शेवाळे, अनिकेत पाटणकर आणि संदीप घुगे यांनीही घवघवीत यश मिळवले आहे. देशभरात यंदा मुलींनी बाजी मारली असून, दिल्लीतील अपंग असलेल्या भारतीय महसूल सेवा अधिकारी ईरा सिंघल हिने देशातून पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे पहिल्या चारही जागा मुलींनीच काबीज केल्या आहेत. केरळची रेणू राज ही द्वितीय, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी निधी गुप्ता हिने तिसरे स्थान पटकाविले आहे. दिल्लीतीलच वंदना राव चौथ्या तर आयआरएस अधिकारी सुहर्ष भगत पाचव्या क्रमांकावर आहेत.देशातून यूपीएससीच्या १ हजार ३६४ पदांसाठी साडेचार लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार २८६ उमेदवार अंतिम परीक्षेपर्यंत पोहोचले होते. मुलाखतीपर्यंत ३ हजार ३०८ विद्यार्थी पोहोचले. त्यानंतर चार दिवसांतच निकाल जाहीर झाला. यात पहिले चार क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत. दिल्लीच्या ईरा सिंघल हिने देशात पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनीच बाजी मारली. मुलांमध्ये सुहर्ष भगत हा देशात पहिला आला आहे. (प्रतिनिधी)माझे प्रेरणास्थान सचिन तेंडुलकर असून, त्याने आपल्या खेळाप्रति ठेवलेली निष्ठा समोर ठेवूनच मी यूपीएससीचा अभ्यास केला. त्यामुळे या परीक्षेत मला दुसऱ्यांदा यश मिळाले. केवळ हुशारी असून चालत नाही, तर कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. - अबोली नरवणे, राज्यातून पहिलीमी आनंदित आहे. विश्वासच बसत नाही. मी केवळ परीक्षेची तयारी केली होती. मला आयएएस अधिकारी व्हायचे होते. विकलांग लोकांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.- ईरा सिंघल, देशात प्रथम