शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वर्गवारी होईना ‘अपडेट’; मराठा विद्यार्थी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:54 IST

एमपीएससी अर्ज भरण्यात अडथळे

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून त्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजालाही प्रतिनिधित्व दिले. मात्र, या प्रवर्गातील लाखो विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष अर्ज भरण्यात अडथळा निर्माण झाला आहे. यापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गवारीतील माहितीच ‘अपडेट’ होत नाही. त्यामुळे त्यांना अर्जही करता येत नाही. परिणामी हजारो विद्यार्थी या अडचणीमुळे त्रस्त झाले आहेत.राज्य शासनाने मराठा समाजाला ‘एसईबीसी’ अंतर्गत १६ टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार आयोगाने नुकतीच विविध ३४२ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग देऊन १६ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. नव्याने अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत नाहीत. मात्र, यापूर्वी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.महाऑनलाईन एमपीएससीच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी लागते. त्यानंतर प्रोफाईलमध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक असते. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार जातीनुसार प्रवर्गाची निवड केली जाते. परंतु ही निवड एकदा करून जतन केल्यास त्यानंतर यात बदल करता येत नाही. राज्यसेवेच्या जाहिरातीत दिल्याप्रमाणे एसईबीसी प्रवर्गाच्या वेगळ्या जागा आहेत. आता ज्या मराठा विद्यार्थ्यांनी यापूर्वी आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्या प्रवर्गाची निवड केली आहे, अशा मराठा विद्यार्थ्यांना आता एसईबीसी हा प्रवर्ग अद्ययावत करता येत नाही. आयोगाकडून अद्याप तशी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.आयोगाच्या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमकाही विद्यार्थ्यांनी वर्गवारी अद्ययावत होत नसल्याबद्दल आयोगाशी ई मेलद्वारे संपर्क साधला. आयोगाने या विद्यार्थ्यांना जातीच्या तसेच प्रवर्गाशी संबंधित तक्रांरींसाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी आपले लॉग इन विषयी सविस्तर माहिती संबंधित ई- मेलवर पाठवावी असे म्हटले आहे.आयोगाच्या या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. आतापर्यंत हजारो मराठा विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांनी आयोगाकडे याबाबत ई मेल करायचा का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अडचणीमुळे अनेक विद्यार्थी अर्ज कसा करायचा, या विवंचनेत अडकले आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाmarathaमराठाStudentविद्यार्थी