शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
2
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
3
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
4
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
5
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
6
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
7
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
8
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
9
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
10
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
11
SSC Result 2024: दहावी निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा; १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
12
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
13
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले
14
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
15
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
16
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
17
“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?
18
मनसे कार्यकर्ते थेट राज ठाकरेंनाच व्हिडिओ पाठवणार; मनातील भावना व्यक्त करणार
19
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
20
Dhadak 2: एक था राजा, एक थी रानी...! 'धडक 2' ची घोषणा, ही फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत दिसणार

भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!

By विलास बारी | Published: April 03, 2024 12:50 PM

Lok Sabha Election 2024 : मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

जळगाव : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला आहे. तसेच, भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरला आहे.  

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाने उन्मेष पाटील तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. यादरम्यान मंगळवारी त्यांनी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते.

यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. तर माझ्या कामाची किंमत करण्यात आली नाही. मी आत्मसन्मानासाठी लढतोय, तिकीटासाठी नाही, असे म्हणत उन्मेष पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. याचबरोबर, तुमच्या आणि माझ्या भावना सारख्याच आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी जात्यात आहे अनेकजण सुपात - उन्मेष पाटीलही लढाई पदाची जय-विजयाची नाही, ही लढाई आत्मसन्मानाची आहे. विकासाची लढाई आहे. तिथे आत्मसन्मान, संवाद होत नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. आज मी जात्यात आहे, तर अनेकजण सुप्यामध्ये आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्यातील अनेकजण पुढे येतील, असे उन्मेष पाटील यांनी पक्ष प्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Jalgaonजळगावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४