शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 4:19 PM

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंपनी या कार्यालयांमध्ये सामाजिक अंतर प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहे.

मुंबईः महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने वाहनांची नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचे काम कालपासून सुरू केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून 16 जून 2020 रोजी राज्यातील 50 कार्यालयांमध्ये वाहन चालविण्याचा परवाना, दुय्यम परवाना, वाहन नोंदणी व हस्तांतरण सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यात वाहन चालविण्याचा परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स) समाविष्ट आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरूपात हे विभाग बंद करण्यात आले होते आणि आता तीन महिन्यांनंतर ते पुन्हा सुरू होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंपनी या कार्यालयांमध्ये सामाजिक अंतर प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहे.नवीन प्रोटोकॉल अंतर्गत लोक आरटीओ कार्यालयात अगोदरच अपॉइंटमेंट घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना आरटीओच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. प्रत्येक दिवशी ठरावीक लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, कार्यालयात उपलब्ध अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामासाठी कोटा निश्चित केला जावा. जे आरटीओ सेंटर लर्नर परवान्यासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी ६ फूट अंतर आणि संगणक, कीबोर्ड प्रत्येक वेळी वापरल्यानंतर सॅनिटाइज करणे बंधनकारक राहणार आहे.सर्व अर्जदारांनी फेस मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालून कार्यालयात यावे आणि या कार्यालयांमध्ये सॅनिटायझर प्रदान करणे देखील आवश्यक आहे. कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करणारे उमेदवार केवळ सॅनिटायझरनंतरच वाहनात प्रवेश करतील. लॉकडाऊनपूर्वी लर्निंग लायसन्ससाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय फिटनेस नूतनीकरण प्रमाणपत्र सॅनिटायझर केल्यानंतरच दिले जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRto officeआरटीओ ऑफीस