विद्यापीठाचे पूर्ण निकाल ऑनलाइन!
By Admin | Updated: July 1, 2014 01:17 IST2014-07-01T01:17:41+5:302014-07-01T01:17:41+5:30
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळत असे.

विद्यापीठाचे पूर्ण निकाल ऑनलाइन!
>मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळत असे. परंतु येत्या काही दिवसांत जाहीर होणा:या बीए, बीएस्सी आणि इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना गुणही पाहता यावेत, यासाठी परीक्षा विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या नवीन उपक्रमासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर होतो. परंतु निकालानंतर विद्याथ्र्याना त्यांचे गुण पाहता येत नाहीत. दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना त्यांच्या गुणांची प्रत उपलब्ध होते. त्यामुळे विद्याथ्र्याना कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची माहिती
मिळते. परंतु विद्यापीठाचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्याना केवळ उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळते. मात्र गुण समजण्यास विद्याथ्र्याना गुणपत्रिकांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे विद्यार्थी आणि पालक विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
याची दखल घेत विद्यापीठाने मार्च, एप्रिल महिन्यात घेतलेल्या
बीए, बीएस्सी आणि इंजिनीअरिंग
या शाखांचे निकाल जाहीर
होताच ऑनलाइन गुणपत्रिकाही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
सुरू केले आहेत. परीक्षा
विभागातील अधिका:यांना यामध्ये यश आल्यास विद्याथ्र्याना निकालाची गुणपत्रिकाच ऑनलाइन पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)
विद्याथ्र्याची सोय
च्मुंबई विद्यापीठाचे निकाल ऑनलाइन जाहीर होतात, परंतु विद्याथ्र्याना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण इतकीच माहिती मिळते.
च्विद्याथ्र्याना निकालावेळी त्यांचे गुणही उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, येत्या काही दिवसांत जाहीर होणा:या अभ्यासक्रमांचे निकाल या पद्धतीने लावण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.