"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:41 IST2025-01-16T16:40:44+5:302025-01-16T16:41:54+5:30
भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार"
मुंबई - विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. ग्रामीण भागातील नव कल्पना असलेल्या तरुणांनाचा उद्योगात सहभाग वाढवणार असून उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप सुरू करण्यासाठी सहकार्य करणार. शासकीय आणि खाजगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे हे देशातील आधुनिक धोरण ठरणार तसेच राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार आहे असं त्यांनी घोषित केले.
🔸 CM Devendra Fadnavis presided the signing of MoU between the GoM and the Small Industries Development Bank of India (SIDBI) at the 'National Startup Day 2025' program.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 16, 2025
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025' कार्यक्रमावेळी महाराष्ट्र… pic.twitter.com/NpBIx6ReEZ
तसेच नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्ट अप होते आज देशात १ लाख ५७ हजार आहेत. महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६००० स्टार्ट अप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार,धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. इज ऑफ डूईंग बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.उद्योग सुरू करताना मुंबई पुणे मध्ये पोषक वातावरण आहे. मुंबई निधीमध्ये आघाडीवर असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत. नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात असं फडणवीसांनी सांगितले.