शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Union Budget 2019: ‘सॉफ्ट पॉवर’चे खाते अर्थसंकल्पात उघडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:25 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच ‘सॉफ्ट पॉवर’नामक ‘आधुनिक शस्त्रा’चा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांनी शबल अर्थसत्ता होत असलेला भारत एका नव्या पर्वात पाऊल टाकत असल्याची ग्वाहीच जणू दिली!

- अपर्णा वेलणकरकेंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच ‘सॉफ्ट पॉवर’नामक ‘आधुनिक शस्त्रा’चा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांनी शबल अर्थसत्ता होत असलेला भारत एका नव्या पर्वात पाऊल टाकत असल्याची ग्वाहीच जणू दिली!आपली भाषा-संस्कृती-कला-लोकजीवन- प्रथापरंपरा- प्राचीन ज्ञान, संस्कृतीचा ठेवा, देशोदेशी पसरलेली मूळ ‘आपल्या’ वंशाची माणसे या साऱ्याचा शक्तिशाली समुच्चय म्हणजे ‘सॉफ्ट पॉवर’! त्या शक्तीचा नियोजनबद्ध वापर करून जगाच्या राजकारणात आपले वर्चस्व निर्माण करणारे समांतर मार्ग आखण्याचे धूर्त शास्त्र आकारालाआणले ते अमेरिका, जर्मनी यासारख्या देशांनी! आधुनिक काळात हा मान चीनकडेही जातो.भारताचे योगशास्त्र, आयुर्वेद, इथले संगीत, पाकसंस्कृती वा ‘बॉलीवूड’ याकडे ‘संपत्ती’ वा ‘सत्ता’ म्हणून पाहण्याचे ना येथल्या राजकीय नेतृत्वाला सुचले, ना लेखक-कलावंतांनी त्याकरिता काही हातपाय हलवले.‘सॉफ्ट पॉवर’नामक या अस्त्राकडे पहिले पाऊल टाकले ते नरेंद्र मोदींनी! भारताच्या योगासनांना थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये नेऊन त्यांनी शंभराहून अधिक देशांना ‘इंटरनॅशनल योगा डे’मध्ये ओढून आणले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात प्रथमच आपल्या काही संकल्पित योजना ‘सॉफ्ट पॉवर’च्या खात्यात टाकल्या आहेत.शेजारी नेपाळच्या प्राथमिक शाळांमध्ये मँडरीन भाषा शिकण्याची ‘स्वेच्छा’ (सक्ती) सुरू झाली असून, ती शिकवणाºया शिक्षकांचा पगार आपल्या खिशातून देण्याचे ‘औदार्य’ चीनने दाखविले आहे. जर्मनी, जपानसारखे देश तरुण भारतीय मनुष्यबळाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतात मोठी ‘गुंतवणूक’ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात ‘सॉफ्ट पॉवर’चे निदान खाते उघडले जाणे महत्त्वाचे आहे ते म्हणूनच!‘योगा डे’नंतरची ‘सॉफ्ट’ पावले- भारतीय पासपोर्टधारक अनिवासी देशात येताच तत्काळ आधार कार्ड, १६0 दिवसांच्या प्रतीक्षा काळाची अट रद्द- आफ्रिकेमध्ये भारताच्या परराष्ट्र विभागाची १८ संपर्क कार्यालये- २0१९-२0मध्ये चार नवे भारतीय दूतावास- देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १७ पर्यटनस्थळांचा विकास- भारतातील आदिवासी जमातींचे पारंपरिक संगीत, नृत्ये,संस्कृती-संदर्भांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल संग्रहालय’ची निर्मिती

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019