शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश, शालेय साहित्य डीबीटीतून वगळले! पुरवठादारांचं चांगभलं, पण स्वागताचेही सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:26 IST

या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. 

मुंबई : आदिवासी विकास खात्याने सोमवारी घेतलेला एक निर्णय पुरवठादार/कंत्राटदारांच्या पथ्यावर पडणार आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये आतापर्यंत गणवेश व शालेय साहित्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) देण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करून आता हे साहित्य विद्यार्थ्यांना पुरविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. 

वस्तू पुरवठ्याचा पूर्वानुभव लक्षात घेता वैयक्तिक वापरासाठीच्या वस्तूंसाठीचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकला जातो. या प्रक्रियेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री या बाबी वगळण्यात येत असल्याचे सोमवारच्या शासन निर्णयात म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हे साहित्य पुरविण्याऐवजी डीबीटीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुरवठादारांचे धाबे दणाणले. पुरवठादारांच्या लॉबीने हा निर्णय मागे घेण्यासाठी जंग, जंग पछाडले पण फडणवीस यांनी दाद दिली नव्हती. 

आता वस्तूच पुरवणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी योजनांचा लाभ डीबीटीमार्फत करण्याचे धोरण आधीपासूनच स्वीकारले आहे. काही वस्तू डीबीटीतून वगळाव्यात ही शिक्षण विभागाने केलेली विनंती वित्त विभागाने आधीच मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये के. सी. पाडवी आदिवासी विकासमंत्री असताना त्यांनी डीबीटी की वस्तूपुरवठा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांची एक समिती नेमली होती. त्या समितीनेही डीबीटीऐवजी वस्तूपुरवठा करण्याची शिफारस केली होती. 

डीबीटीपेक्षा वस्तू पुरविणे हा निर्णय अधिक योग्य आहे. पुरवठ्यात गडबडी होतात म्हणून डीबीटी आणले खरे पण ते आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले होते. - विवेक पंडित, माजी आमदार डीबीटी बंद करून शालेय वस्तू पुरविण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वस्तू पुरवताना त्यांचा दर्जा राखला जावा, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी हे सरकारने बघितलेच पाहिजे.- प्रतिभा शिंदे, अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चाअत्यंत विचारांती हा निर्णय घेतला आहे. आम्ही पैसा द्यायचो मात्र तो भलतीकडेच खर्च व्हायचा. आता विद्यार्थ्यांना गणवेश आदी पुरवताना भ्रष्टाचार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पुरवठादारांवर विभागाचा पूर्ण वॉच असेल. - डॉ. विजयकुमार गावित, मंत्री, आदिवासी विकास 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीSchoolशाळा